

-राजेश रामपूरकर
नागपूर: देशात वाघ संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न सुरू असताना वाघांचे वाढते मृत्यू चिंताजनक ठरत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ताज्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये देशभरात एकूण १६९ वाघांचे मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी (२०२४) ही संख्या १२४ इतकी होती. अवघ्या एका वर्षात वाघांच्या मृत्यूत ४५ ने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात २०२५ मध्ये ४१ वाघांचे मृत्यू धक्कादायक आहेत. आजच वर्धा जिल्ह्यात एका वाघाचा मृत्यू झाला आहे.