esakal | गळ्यातील फासासह वाघिणीची भ्रमंती
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger

गळ्यातील फासासह वाघिणीची भ्रमंती; फासामुळे मानेवर गंभीर जखम

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : सलग तीन महिन्यांपासून एक वाघीण गळ्यात फास अडकलेल्या स्थितीत चंद्रपूर वनक्षेत्रात फिरत आहे. फासामुळे वाघिणीच्या मानेवर गंभीर जखम झाली आहे. पावसाळ्यात ही जखम आणखी चिघळली असेल. मात्र, अद्याप औषधोपचार करण्यासाठी वाघिणीला जेरबंद करण्यात वनखाते अपयशी ठरले आहे.

चंद्रपूर वनक्षेत्रात मे महिन्यात गळ्यात फास अडकलेल्या अवस्थेतील वाघीण वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना दिसली. वरोरा-भद्रावती परिसरातच वावर असलेल्या या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सुरुवातीला खात्याने मोठा फौजफाटा लावला. गोंधळलेल्या वाघिणीने माणसांपासून दूर तिचा अधिवास शोधला. सुरुवातीपासूनच वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेत नियोजनात त्रुटी दिसून आली.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

ब्रम्हपुरी येथून जीवशास्त्रज्ञ, नेमबाज, पशुवैद्यक आणि दोन लहान बचाव पथक आता या मोहिमेवर आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचारी समन्वय करीत आहेत. मात्र, अद्याप वाघिणाला पकडण्यात यश आलेले नाही. वाघिणीसोबत बछडा आहे. ते दोघेही एकमेकांना संरक्षण देत आहेत. वरोरा आणि चिमूरचा रस्ता ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. ही वाघीण कोणत्याही क्षेत्रात गेली तरीही कक्ष नऊ आणि दहामध्येच येऊन थांबते. दरम्यान, मंगळवारी कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघिणीचे छायाचित्र आले.

शिकारीच्या प्रयत्नातूनच तिच्या गळ्यात फास अडकला असण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल २०१९ मध्ये स्टील वायरच्या जाळ्यात अडकून वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातही पळसगावच्या ग्रामस्थांना अटक करण्यात आली. आताही या वाघिणीच्या गळ्यात अडकलेल्या फासामागे याच गावाचा संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते.

loading image
go to top