esakal | रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि. वाशीम) : तालुक्यातील रामतिर्थ येथील शेतशिवारात असलेल्या विहिरीत युवक दोरीचा सहारा घेत रात्रभर पाण्यात राहून सुद्धा जिवंत होता. स्थानिक युवकांनी त्याला ओढून बाहेर काढले. ही घटना शनिवारी (ता. ४) घडली.

मानोरा तालुक्यातील रामतिर्थ शेतशिवारात असलेल्या ४० फूट खोल विहिरीत जनुना येथील चिंतामण श्यामराव खापरकर (वय ३५) हा युवक थोडा वेडसर असल्यामुळे ३ सप्टेंबर रोजी विहिरीतील पाण्यात उतरला की पडला याची पुसटशी कल्पना देखील कुणाला नव्हती. तो युवक संपूर्ण शरीर पाण्यात सोडून व इलेक्ट्रिक मोटरचा केबल धरून रात्रभर पाण्यात राहिला.

४ सप्टेंबर रोजी सकाळी स्थानिक कैलास नावाचा युवक बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी शेतात गेला असता विहिरीत कुणी तरी बडबड करीत असल्याचा आवाज त्याला आला. त्याने विहिरीत डोकावून पाहले असता युवक आढळला. संपूर्ण शरीर व हात पांढरे फटक झाले होते. कैलासने तत्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

गावातील युवकांनी कारखेड पोलिस पाटील वासुदेव सोनोने यांना माहिती दिली व तातडीने घटनास्थळी पोहोचले. राजू टाले, नीलेश गावंडे व इतर युवकांनी मिळून विहिरीत अडकून पडलेल्या युवकाला दोराच्या मदतीने बाहेर काढले. चौकशी अंती हा युवक जनुना येथील असल्याचे समजले. तेथील पोलिस पाटील नीलेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता युवक चिंतामण खापरकर हा थोडा वेडसर असल्याची पुष्टी मिळाली. रात्रभर हा युवक पाण्यात राहून सुद्धा जिवंत राहल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.

loading image
go to top