Wild Animal : वाघासह हजारो वन्यजीव अधिवासात मुक्त; निवारा व उपचार केंद्राचे यश

वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास या सर्व गोष्टींचा फटका वन्य प्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो आहे.
tiger
tiger sakal

नागपूर - वन्यजीवांच्या अपघातानंतर त्वरित उपचार, बचाव आणि संगोपनासाठी शहरात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा व उपचार केंद्रामध्ये (ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर) मार्च २०२२ ते नोव्हेंबरपर्यंत २०२३ या कालावधीत २,२५० वन्यप्राण्यांसह पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातील १,८६० वन्यप्राण्यांसह पक्ष्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहे.

गेल्या आठ वर्षांत प्रथमच बचाव मोहिमेद्वारे सुटका केलेल्या वन्यप्राण्यांच्या आकड्यात विक्रमी भर पडली आहे. यावरूनच हे केंद्र वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत असल्याचे अधोरेखित झालेले आहे.

वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास या सर्व गोष्टींचा फटका वन्य प्राण्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. मानव-वन्यजीव संघर्षही वाढतो आहे. त्यातून तात्पुरत्या निवारा व उपचार केंद्राची ही संकल्पना पुढे आली. भारतात पहिल्यांदा २०१५ मध्ये हे केंद्र नागपुरात अस्तित्वात आले. या संकल्पनेला सेमिनरी हिल्स येथे मूर्त रूप प्राप्त झाले.

या केंद्रामागील मूळ संकल्पना अपघात किंवा अन्य कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांचा बचाव करणे, उपचार करणे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडणे अशी आहे. त्यानुसार ते काम करीत आहे. गेल्या आठ वर्षांत ७,७६० वन्यप्राणी आणि पक्ष्यांची सुटका केली आहे. त्यातील ५,१४१ प्राणी वाचविण्यास यश आले असून २,६१९ वन्यप्राणी उपचारादरम्यान मरण पावले.

ट्रिटमेंट ट्रान्झिट सेंटर हे आता बदलत्या परिस्थितीनुसार गरजेचे झालेले आहे. मानव - वन्यजीव संघर्ष वाढलेले असताना हे सेंटर आदर्श ठरु लागले आहे. आतापर्यंत पाच हजारपेक्षा अधिक वन्यप्राण्यांसह पक्ष्यांनाही निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहे. राज्यात असे केंद्र व्हावे अशी राज्य शासनाची भूमिका आहे.

- डॉ. भरतसिंह हाडा, उपवनसंरक्षक

वन्यप्राण्यांसाठीच्या तात्पुरत्या उपचार केंद्राची कामगिरी आणि गरज लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील ११ नवीन केंद्रांना मान्यता दिली व काम सुरू झाले. महाराष्ट्राव्यतिरिक्त राजस्थानात दोन व कर्नाटक राज्यात तीन केंद्रे उभारण्यात येत आहेत. ही संकल्पना समजून घेण्यासाठी देश-विदेशातील वन्यजीव अभ्यासक व प्रेमी केंद्राला भेट देत असतात.

- कुंदन हाते, माजी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com