विविध रिक्त पदाअंतर्गत सेवेच्या नियमतीकरणाची हमी द्या; ‘कोरोनायोद्धां’वर आली उपासमारीची वेळ

The time of famine came upon the Corona Warrior
The time of famine came upon the Corona Warrior

धानला (जि. नागपूर) : जीवावर उदार होऊन कोरोना महामारीच्या काळात राज्यातील आरोग्य विभागात विविध सहयोगी सेवापदावर नियुक्त झालेल्या (सेवासमाप्त करण्यात आलेल्या) अशा सर्व कोरोना योद्धा सेवाकर्मींना, सामाजिक सुरक्षा व मानव अधिकाराच्या आधाराने विभागातील विविध रिक्त पदांतर्गत सेवेच्या नियमतीकरणाची हमी देण्यात यावी, या आशयाचे निवेदन स्थानीय निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खंजाजी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

पूर्व विदर्भात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियाअंतर्गत एप्रिल महिन्यादरम्यान डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत कंत्राटी पद्धतीवर ५ हजार १६५ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. परंतु, आता रुग्ण कमी झाल्याचे सांगत डॉक्टर वगळून इतर सर्व कर्मचारी कार्यामुक्त केले जात आहेत.

शासनाला डॉक्टर, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, अधिपरिचरिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टोअर किपर, डाटा एंट्री ऑपरेटर, वार्ड बॉय या संवर्गातील पदांची गरज होती. या तरुण व तरुणीं जीवाच्या दहशतीच्या वातावरणात कोणत्याही सामाजिक सुरक्षा व मानवी सुरक्षा शर्ती व अटीशिवाय सेवा प्रदान करी होते. म्हणून त्यांच्या या आगळ्यावेगळया सेवेप्रति शासन व जनता वेळोवेळी ‘कोरोनायोद्धा’ म्हणून गौरव करीत आहे.

या सेवाकर्मींचे मोठे योगदान असून याचा अर्थ या समस्त सेवा यथास्थितीत ठेवल्यास आरोग्य विभागातील सेवा यथायोग्य पार पाडण्यात काही अंशी मदतच मिळणार आहे. त्याकरिता आरोग्य विभागातील रिक्त पदातील काही सेवापदावर अशा सेवाकर्मीना पूर्णवेळ कार्यरत म्हणून नियुक्ती देऊन सामाजिक सुरक्षा देणे वेळेसमोरील आवाहन आहे.

अशा सेवाकर्मीना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे शासनाची जबाबदारी ठरते. शिवाय या संकटाने आरोग्य विभागासमोर निर्माण झालेल्या संसाधनीय अभावाच्या आव्हानाला सामोरे जाण्याकरिता अशा सेवाकरींची सेवा कायम करणे आरोग्य विभागांची गरजच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या आहेत मागण्या 

  • आरोग्य सेवेत पूर्णवेळ कार्यरत म्हणून समावेशाकरिता धोरणात्मक व कायदेशीर निर्णय घ्या
  • आरोग्य विभागातील संबंधित रिक्तपद भरतीकरिता त्वरित भरती मोहिम सुरू करा
  • सर्व सेवाकर्मीना अशा संबंधित पदावर पात्रतेनुसार नियुक्तीत ५०टक्के समांतर आरक्षणाचे वर्ष २०२१-२२ करिता नियम करा
  • अशा सेवाकर्मिच्या सेवासमाप्तिच्या अटीत अशा सर्व सेवाकर्मीना सामाजिक सुरक्षा म्हणून २५ लाख प्रत्येकी देण्याचे प्रयोजन करा
  • शासनाने ठरवलेले सुरक्षा कवचचे प्रयोजन ५० लाख प्रत्येकी सर्व सेवाकर्मीना सामाजिक सुरक्षा म्हणून तात्काळ द्या

कुणावरही बेरोजगरीची वेळ येणार नाही
आरोग्य विभागात मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यात सामावून घ्यायला हवे. यामुळे शासनाला कर्मचारी मिळतील व कुणावरही बेरोजगरीची वेळ येणार नाही. 
- राम वाडीभस्मे
मुख्यसंयोजक, ‘कोरोना योद्धा’ सेवा सुरक्षा अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com