फेसबुक, इंस्टाग्राम, व्टिटर अन्‌ व्हाट्सअप डीपीवर तिरंगा; देशभक्ती व्यक्त करण्याची अनोखी पद्धत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल घराघरांमध्ये तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले.
social media
social mediasakal
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल घराघरांमध्ये तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल घराघरांमध्ये तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले. तसेच, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी (डिस्प्ले पिक्चर)मध्ये तिरंग्याची प्रतिमा ठेवावी, असेही आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाचे कौतुक करीत अनेक नेटकऱ्यांनी याचे अनुसरण केले आहे. काहींनी मात्र ‘हा फक्त दिखाऊपणा’ असल्याची प्रतिक्रिया दिली.

तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाचा एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. तो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतो. अमृतमहोत्सवी वर्षात देशाच्या प्रगतीमध्ये योगदान असणाऱ्या घटनांचा, गोष्टींचा केंद्र सरकारला विसर पडला आहे. सोशल मीडियाचा माध्यमातून सुरू असलेल्या अभियानातून विकासकामांना आलेले अपयश झाकणे हा उद्देश यातून दिसून येतो.

- शशिकांत थोटे, समाजसेवक, हिंगणा

अधिकाधिक लोकांच्या मनात आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेला अभिमान आणि आदर अधिक जागृत करणे, लोकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती घडवून आणणे देशातील लोकांमध्ये ऐक्य निर्माण करणे, हा आहे. ही मोहीम राबविण्याचा भारत सरकारचा मुख्य हेतू म्हणजे देशातील जनतेच्या मनात असलेली देशप्रेमाची, देशभक्तीची भावना अधिक प्रखर करणे, हा आहे.

- प्रतीक कोल्हे, कळमेश्वर, नागपूर

सोशल मीडियावर तिरंग्यासह फोटो टाकणे हा देशभक्तीचा दिखाऊपणा वाटतो. देशाभिमान, देशभक्ती एक दिवस व्यक्त करून होत नाही. ती मुळातच अंगी बाळगायला हवी, नसानसात भिनायला हवी. सर्वप्रथम देशाचा विचार व्हायला हवा. मी, माझे आणि स्वार्थ नंतर. आज फक्त झेंडे घेऊन मिरवले जातात. त्या झेंड्यावरून दंगलीसुद्धा घडतात. क्षणभरात देशाच्या करोडो रुपयांच्या साधनसंपत्तीचे नुकसान केले जाते, जाळपोळ केली जाते. यातून, तिरंग्याचे महत्त्व व सन्मान राखला जात नाही.

- वर्षा कीडे-कुलकर्णी, कवयित्री

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. मी भारतीय असल्याचा मला गर्व आहे. माझा देश माझा अभिमान आहे. आपल्या देशाप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी यंदाचे वर्षी ‘घर-घर तिरंगा, हर मन तिरंगा’ हे अभियान राबविल्या जात आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या अभियानाचे मी समर्थन करतो. मी माझ्या घरावर तिरंगा फडकावणार. देशभक्ती व्यक्त करण्यासाठी मला जे करायला हवे ते-ते मी करणार. सोशल मीडियावर प्रचार होतोय, तोही स्तुत्य आहे.

- नरेश गडेकर, प्रभारी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई

सर्व भारत भर अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्याने घरोघरी तिरंगा लावण्याचे आव्हान केले आहे. तिरंग्यासह फोटो ठेवणे हे भावनेवर आधारित केलेले आवाहन असू शकते.

- महेश रायपूरकर, अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com