
नागपूर : टोमॅटो महागले; इतर भाज्या ग्राहकांच्या आवाक्यात
नागपूर - स्थानिक टोमॅटोची आवक कमी झालेली असून जयपूर आणि बरेली येथून आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव कडाडले आहे. सध्या राज्यातूनही टोमॅटो आवक बंद झाल्याने किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० ते ७० रुपये किलो झाले आहेत. अशीच स्थिती राहिल्यास पुन्हा भाव वाढ अपेक्षित आहे. इतर भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू आहे. भाज्यांचे भाव ग्राहकांच्या आवाक्यात आलेले आहेत.
मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने भाव स्थिरावलेले आहेत. पावसाळी वातावरण असून काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा भाजीपाल्याच्या शेतीला फायदा झाला आहे. चार दिवसापूर्वी टोमॅटो ६० रुपये किलोवर गेले होते. त्यात किंचित घसरण झाली असून ४० रुपयांवर आले आहे. याशिवाय उन्हाळी भाज्यांची आवकही वाढली आहे, असे ठोक भाजी विक्रेते राम महाजन यांनी सांगितले.
भाजीपाला ठोक भाव (रुपये / प्रतिकिलो)
वांगे - २०, फुलकोबी २०, पानकोबी - १५, टोमॅटो - ४०, मेथी - ४०, कोथिंबीर- ६०, शिमला मिरची - ६०, हिरवी मिरची - ५०, पालक - २०, भेंडी - ४०, तोंडले - ३०, कोहळे - २०, दुधी भोपळा - १५, मुळा - २०, काकडी - १५, ढेमस - ४०, कारले - ३०, घोळभाजी - २०, बारीक घोळ - ३०, दोडके - ४०, आंबा - ४०, चवळी शेंग - २५.
Web Title: Tomatoes Are Expensive Other Vegetables Within The Reach Of Consumers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..