
सावनेर : कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात बुधवारी (ता. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज कोसळल्याने माय-लेकासह तिघांचा मृत्यू झाला. वंदना प्रकाश पाटील (वय ४२), ओम प्रकाश पाटील (वय १८) आणि निर्मला रामचंद्र पराते (वय ६५, सर्वजण धापेवाडा) अशी मृतांची नावे आहेत.