खामगाव : गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणात असलेल्या प्रियकराने प्रियसाचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सजनपुरी गावानजीक हॉटेल जुगनू मध्ये घडली..या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील प्रेमी जोडपे गेल्या दोन तीन दिवसापासून शहरा लगत असलेल्या सजनपुरी गावालगत महामार्ग क्रमांक सहा वरील हॉटेल जुगनू मध्ये रूम करून राहत होते. .दरम्यान मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन्ही प्रेमी युगलामध्ये वाद झाला. त्यानंतर युवकाने सदर मुलीला रूममध्ये भोसकून तिचा खून केला तर स्वताःच्या अंगावरही धारदार शस्त्राने वार करून तो धावत रूमच्या बाहेर आला व जखमी अवस्थेत कोसळला..Madha Flood : प्रयत्न जिंकले, निसर्ग हरला; वाकाव येथे पुराच्या विळख्यातून नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला सुरक्षित दवाखान्यात पोहोचवले.दरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. दोन्हीही प्रेमी जोडपे हे साखरखेर्डा येथील असून मुलाचे नाव सोनू ऊर्फ साहिल राजपूत व मुलीचे नाव पायल पवार असल्याचे पोलिसांनी सांगितले..दरम्यान घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. यावेळी पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार रामकृष्ण पवार, ठाणेदार सुरेंद्र अहिरकर यांच्या सह बुलडाणा येथील फॉरेन्सिक टीम व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. वृत्तलिहेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.