कामठी : कामठी रिंग रोडवरील रनाळा शिवारात एका अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत महिला कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली..उमा घनश्याम शर्मा (४५, रा. डहाके लेआऊट, गोधणी रोड, नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. उमा शर्मा या ऑरेंज सिटी बिल्डरकडे कामासाठी मिस्त्रीसोबत गोधणीहून भिलगाव येथे जात होत्या. .रनाळा शिवारात रिंग रोड ओलांडताना लिहीगावावरून कळमेश्वरकडे जाणाऱ्या पिवळ्या व शेंदरी रंगाच्या टेम्पो सदृश अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या शरीराचे दोन तुकडे होऊन त्यातील एक भाग २०० मीटरवर फेकला गेला. .Nagpur News: वाघाच्या दहशतीने मोडले ठरलेले लग्न! पारशिवनी तालुक्यातील वास्तव.आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. मुलगा उमेश शर्माने नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींचा शोध घेत आहेत. घटनास्थळी मृतकाचे नातेवाईक धाय मोकलून रडत होते. पोलिस तपास सुरु आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.