Nagpur Accident: नागपूर अमरावती मार्गावर भीषण अपघात; टाटा एसच्या धडकेत क्लीनरचा जागीच मृत्यू
Accident News: कोंढाळी येथे नागपूर-अमरावती महामार्गावर टाटा एस गाडीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने क्लीनर कृष्णा कुकडे (वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कोंढाळी : नागपूर अमरावती राज्यमार्गावरील जिनिंग प्रेस समोर गुरुवारी (ता.१८) रात्री झालेल्या भीषण अपघातात टाटा एस गाडीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने क्लीनरचा जागीच मृत्यू झाला.