tanker bike accident
sakal
नागपूर - सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरबीआय चौकात दुचाकीला टॅंकरने धडक दिल्याने जखमी झालेल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी टॅंकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.