Nagpur News: विसर्जनाचा जल्लोष शोकात बदलला; दुर्गादेवीचे विसर्जन करताना तलावात बुडून युवकाचा मृत्यू
Drowning Accident: सावनेर तालुक्यात दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना शेषराव सोनवणे या ४४ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले, मात्र रविवारी सकाळी मृतदेह सापडला.
सावनेर : दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला. तेलकामठी शिवारातील केसरनाला तलावात शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.