Nagpur Metro Art Display : नागपूर मेट्रोमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य झळकले
Tribal Student Art Nagpur : नागपूर मेट्रोमध्ये शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या कला-कौशल्याचे सादरीकरण करून उन्हाळी शिबिराचा विशेष अनुभव दिला.
नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नागपूर मेट्रो प्रवासादरम्यान कलाकौशल्याचे सादरीकरण केले. उन्हाळी शिबिराचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण केले.