
नागपूर : आदिवासींच्या पारंपारिक उपचारपद्धतीचा सन्मान करीत आधुनिक उपचारातून आदिवासींना जोडण्याचा प्रकल्प सुरु झाला. या प्रकल्पाअंतर्गत विदर्भातील आदिवासींची माहिती जगभरातील आदिवासी संशोधकांना व्हावी या हेतूने आरोग्य परिषदेला लकाकी देत ‘एम्स’मध्ये चक्क ट्रायबल व्हिलेज अर्थात आदिवासींचे गाव तयार करण्यात येत आहे.