

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपाजवळ शनिवारी (ता.३१ ) दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका ट्रक ड्रायव्हरचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.