Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना
Ramtek Road Accident: तुमसर–रामटेक मार्गावरील किरणापूर शिवारात बोलेरो पिकअपच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पती गंभीर जखमी असून फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोदामेंढी (मौदा) : तुमसर रामटेक मार्गावरील किरणापूर शिवारात मंगळवारी (ता.१०) भरधाव वेगात असलेल्या बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला मागुन धडक जोरदार दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले.