Crime News : नागपूरच्या सीताबर्डी येथील वसंतराव नाईक झोपडपट्टीत शिवीगाळ करणाऱ्या गुंड व त्याच्या मित्राचा खून करण्यात आला. या दुहेरी खुनानंतर दोघा भावांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर : घरासमोर उभे राहून शिवीगाळ करणाऱ्या सीताबर्डी येथील वसंतराव नाईक झोपडपट्टीत कुख्यात आबूच्या टोळीतील तडीपार गुंडासह त्याच्या मित्राचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता.९) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.