
अकोला : अकोला वनपरिक्षेत्रात काळवीटाची शिकार करून वाहनातून मास घेवून जाणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे. आरोपी जवळून दोन लाकडी बुंधे, अंदाजे तीन किलो काळवीटाचे मास, दोन सुरे, दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, दोन आरोपी फरार झाले असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.