esakal | खेळणे जिवावर बेतले; मैदानात वीज पडून दोन युवक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

खेळणे जिवावर बेतले; मैदानात वीज पडून दोन युवक ठार

खेळणे जिवावर बेतले; मैदानात वीज पडून दोन युवक ठार

sakal_logo
By
दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : परिसरातील चनकापूर चमत्कारी हनुमान मंदिरासमोर असलेल्या मैदानावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वीज पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. एक बालक किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तन्मय सुनील दहीकर (वय १७) व अनुज कुशवाह (वय २१) अशी मृत युवकांची नावे आहेत. तर सक्षम सुमित गोटफोडे (वय १३, रा. पाचपावली) असे किरकोळ जखमी बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चनकापूर वेकोलि वसाहतीतील रहिवासी तन्मय व अनुज हे महाराष्ट्र विद्यालय ज्युनिअर कॉलेज, खापरखेडा येथील विद्यार्थी होते. मृत व जखमी चनकापूर मैदानावर पावसातच फुटबॉल खेळत होते. खापरखेडा परिसरात सव्वा चार वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटात मुसळधार पाऊस झाला.

हेही वाचा: कुंभी वाघोलीचे सीताफळ वन बहरले; तीन वर्षांपूर्वी लागली होती आग

पाच वाजताच्या सुमारास पाऊस कमी झाल्यानंतर फुटबॉल खेळत असताना अचानक वीज पडून दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर तिसरा मुलगा किरकोळ जखमी झाला. जखमी हा चनकापूर वेकोलि वसाहत येथे मिलिंद ढोरे यांच्याकडे पोळ्यासाठी आला होता. तसा तो नेहमी मिलिंद ढोरे या नानाकडे येत होता. यामुळे त्याचे चनकापूर वसाहतीत मित्र झाले होते. तो नेहमी चनकापूरला आल्यावर मित्रांसोबत खेळायचा.

शुक्रवारी तो युवकांसोबत पावसात खेळायला गेला होता. सोबत खेळत असलेल्या दोघांचा मृत्यू झाल तर तो थोडक्यात बचावला. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती काही वेळातच वाऱ्यासारखी पसरली. खापरखेडा पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. दोन्ही युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेयो शासकीय रुग्णालयात पाठविले.

loading image
go to top