

Heavy police presence at the market area in Arvi city following the shocking double murder.
sakal
आर्वी (जि. वर्धा): संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी एक थरारक घटना बुधवारी (ता. २१) सकाळी येथील मुख्य बाजारपेठेत घडली. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका युवकाच्या अमानुष हल्ल्यात संजय राऊत व रामाजी वांगे या दोन वृद्धांना जीव गमवावा लागला. या घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण आर्वी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.