
नागपूर : भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दोघांना उडविले. ही धडक इतकी जोरदार होती की, जागीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास मानेवाडा ते तुकडोजी पुतळा चौक दरम्यान घडली. नितीन राजेंद्र कटरे (१८) आणि कोमल भगवती यादव (१७) दोन्ही राहणार बालाजीनगर, कळमना अशी मृतांची नावे आहेत.