Makar Sankranti : संक्रांतीच्या उत्साहाला दोन मृत्यूंनी लावले गालबोट; पतंगाच्या मागे धावताना हार्ट अटॅकने युवकाचा मृत्यू
Sankranti Festivities Accident : नागपूरमध्ये संक्रांतीच्या उत्साहात पतंग उडवताना छतावर पडून एकाचा मृत्यू झाला, तर पतंगाच्या मागे धावताना हार्ट अटॅक येऊन युवकाचा मृत्यू झाला. विविध घटनांमध्ये ४५ जण जखमी झाले.
नागपूर : उपराजधानीत पतंग उडवताना छतावरून पडून एकाचा मृत्यू झाला तर पतंगामागे धावताना हार्ट अटॅक येऊन युवकाचा मृत्यू झाला. तर विविध घटनांमधेय तब्बल ४० जण जखमी झाल्याने संक्रांतीच्या उत्साहाला गालबोट लागले.