Nagpur News: गावांना पाणी देण्यासाठी घेतली नदीत उडी; नदी पार करत केली दुरुस्ती, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे धाडस
Water Supply: वीजवाहिनीतील बिघाडामुळे १२ ते १४ गावांचा पाणीपुरवठा थांबला होता. महावितरणचे दोन कर्मचाऱ्यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या वेणा नदीत उडी घेऊन बिघाड दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला.
नागपूर: जिल्ह्यातील जवळपास १२ ते १४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणारी वाहिनी बिघाडामुळे अचानक बंद पडली.