नागपुरात चोवीस तासांत दोन हत्याकांड; डोळे वटारल्याने खून

अनिकेतने आरोपी भूषण सोमकुंवरकडे डोळे वटारून बघितले
murder
murdermurder

नागपूर : चोवीस तासांत शहरात दोन हत्याकांड उघडकीस आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पहिल्या घटनेत फक्त डोळे वटारून बघितल्यामुळे अनिकेत तांबे या युवकाचा खून (two murder in Nagpur) केला. दुसऱ्या घटनेत गुमगाव येथे दारू पिण्याच्या वादातून सात मित्रांनी धीरज माकोडे या युवकाचा खून केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत सुनील तांबे (२५, रा. मोहननगर, खलासी लाइन) हा गांधीसागर येथील मेहतर को. ऑप. सोसायटी येथे कामाला होता. आरोपींचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अनिकेत हा चुलत भाऊ आयुष तांबे आणि मित्र दिपेश बुर्रेवार यांच्यासह कोल्ड्रिंक पिण्यासाठी गौतमनगर येथे आरोपींच्या घराजवळ गेले होते. त्यावेळी अनिकेतने आरोपी भूषण सोमकुंवरकडे डोळे वटारून बघितले.

murder
पाकिस्तानी रुपयाची अवस्था वाईट; इम्रानच्या कारकिर्दीत स्थिती खराब

काय पाहतोस अशी भूषणने त्याला विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत भूषणचा मित्र ऋषभ लोखंडेने अनिकेतला शिवीगाळ केली. लोकांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. त्यानंतर अनिकेत हा घरी निघून गेला. रात्री १२ च्या सुमारास पुन्हा अनिकेत हा साथीदारांसह भूषणच्या घरी आला आणि शिवीगाळ करू लागला.

त्यामुळे जय अशोक सोमकुंवर आणि भूषण सुखदेव सोमकुंवर यांनी त्याला हातबुक्कीने मारहाण केली. त्यानंतर जय सोमकुवरने चाकू काढून अनिकेतचा गळा कापून जागीच ठार केले. खून केल्यानंतर दोन्ही आरोपी पळून गेले. सदर पोलिसांनी रात्रीच आरोपींचा शोध घेऊन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोघांनाही मानकापूर येथून पकडले. याप्रकरणी सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.

दारूच्या वादातून मित्राचा खून

मित्रांसोबत शेतात ओली पार्टी करायला गेलेल्या सात युवकांनी दारूच्या किरकोळ वादातून मित्राचा खून केला. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास गुमगाव शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, एक फरार आहे. धीरज ज्ञानेश्वर माकोडे (२४, रा. गुमगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धीरज रामानुज मिश्रा (२४), स्वप्नील नारायण डेकाटे (२५), श्रीराम लक्ष्मण ढोले (३६), क्रिष्णा अशोक मेंडुले (२६), जितेंद्र पीतांबर ढोले (३५) सर्व राहणार गुमगाव व राजकुमार मारोती डेरकर (२७, रा. सातगाव) यांना हिंगणा पोलिसांनी अटक केली. घटनेतील मुख्य आरोपी मंगेश टोंगे हा फरार आहे. धीरजचे गुमगावला चिकन सेंटर आहे‌. सर्व आरोपी हे त्याचे मित्र आहेत.

murder
‘पोलिसांच्या कारवाईला नव्हे तर एनसीबीच्या कारवाईला प्रसिद्धी मिळते’

सर्वांनी ओली पार्टी करायचे ठरवले होते. गुमगाव पासून दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात सायंकाळी सर्व दारू व मटण घेऊन गेले. धीरज माकोडेला काही काम असल्याने बुटीबोरीला गेला होता. इकडे उर्वरित सर्व मित्रांनी जेवण शिजविण्यास व सोबतच दारू पिण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा धीरज तिथे पोहोचला. त्यावेळी दारू कमी उरली होती.

उरलेली दारू तो एकटाच पीत असताना मुख्य आरोपी मंगेशने त्याला स्वतःसाठी एक पेग मागितला. यावरून वाद सुरू झाला. हाणामारीत तिथेच पडलेल्या तीक्ष्ण हत्याराने मंगेशने धीरजच्या पोटावर वार केला. यानंतर घटनास्थळा वरून पळ काढला. काही आरोपीही हा प्रकार पाहून पळून गेले. आरोपी श्रीराम ढोले, क्रिष्णा मेंडुले, जितेंद्र यांनी जखमीला गाडीत बसवून मेडिकलला नेले. मात्र, डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com