esakal | हवाई सुंदरी विमानाने नागपुरात आली, पॉश हॉटेलमध्ये थांबली आणि पुढे...
sakal

बोलून बातमी शोधा

Two young Air Hostess in prostitution

पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये छापा टाकून 25 वर्षीय दोन तरुणींची सुटका करून दोन दलालांसह तिघांना अटक केली.

हवाई सुंदरी विमानाने नागपुरात आली, पॉश हॉटेलमध्ये थांबली आणि पुढे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : झटपट श्रीमंत होण्याचा नादात तसेच पैसा कमावण्यासाठी चक्‍क चित्रपटांतील अभिनेत्री, टीव्ही मालिकांमधील नट्या आणि फॅशन जगतातील मॉडेल्स देहव्यापारात उतरत आहेत. तसेच आता देश-विदेशात विमानात ग्राहकांना सेवा देणाऱ्या काही एअर होस्टेसही देहव्यापाराच्या दलदलीत उतरल्याची माहिती गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात समोर आली.

पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये छापा टाकून 25 वर्षीय दोन तरुणींची सुटका करून दोन दलालांसह तिघांना अटक केली. तुषार ऊर्फ सुल्तान कन्हैया पारसवानी (वय 26, रा. न्यू मनीषनगर ), नीलेश दीनदयाल नागपुरे (वय 19, रा. कावरापेठ ) व रजत राजेश डोंगरे (वय 24, रा. वर्मा ले-आऊट) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तुषार मास्टरमाइंड असून, यापूर्वी 2018 मध्येही पोलिसांनी त्याला अटक केली होती.

मित्रांसह ती गेली ढाब्यावर, मात्र तिचीच पार्टी तिच्यासाठी ठरली शेवटची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार इंदूर व कोलकाता येथील दलालाच्या संपर्कात आहे. त्याने येथील दलालांशी संपर्क साधला. इंदूरमधील दलालाने हवाई सुंदरीला पाठविण्याचे आश्वासन तुषार याला दिले. 28 फेब्रुवारीला हवाई सुंदरी विमानाने नागपुरात आली. ती वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये थांबली. दुसऱ्या दिवशी रजत यानेही कोलकाता येथील तरुणीला नागपुरात बोलाविले. त्यानंतर दोघांनी ग्राहकांशी संपर्क साधायला सुरुवात केली. तुषार एका ग्राहकाकडून 25 हजार रुपये घ्यायचा. नागपुरे हा ग्राहकाने सांगितलेल्या हॉटेलमध्ये तरुणी पोहोचविण्याचे काम करायचा.

याबाबत गुन्हेशाखेला माहिती मिळाली. गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाद्वारे तुषार याच्यासोबत संपर्क साधला. तुषार याने ग्राहकाला हॉटेलमध्ये खोली बुक करायला सांगितली. बनावट ग्राहकाने सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेलमध्ये खोली बुक केली. हवाई सुंदरी व अन्य एका तरुणीसह तिघे हॉटेलमध्ये आले.

गुन्हेशाखा पोलिसांनी तिघांना अटक करून दोघींची सुटका केली. पोलिसांनी तुषार, रजत व नागपुरेविरुद्ध गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तुषार एका ग्राहकाकडून एका ग्राहकाकडून 25 हजार रुपये घ्यायचा. तर तरुणींना एक लाख रुपये असे 10 दिवसांचे पॅकेज देत होता, अशी माहिती मिळाली आहे.

loading image
go to top