अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मामाने केली भाच्याची हत्या

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद झाल्याने मामाने भाच्याचा खून केला. हा थरार गड्डीगोदाम येथे शुक्रवारी मध्यरात्री घडला.
Murder
MurderMurder

नागपूर - पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद झाल्याने मामाने भाच्याचा खून केला. हा थरार गड्डीगोदाम येथे शुक्रवारी मध्यरात्री घडला. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मामाला अटक केली आहे. अतुल प्रकाश उके (वय ४३, कारदीपुरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दिनेश भगवानदास लोखंडे (४९, गड्डीगोदाम) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल उके हे वाडीतील एका कॉलेजमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी होते. मामा दिनेश लोखंडे हा पेंटिंगचे काम करतो. दिनेश व त्याची पत्नी पिंकी यांच्यात कौटुंबिक कलहातून सतत वाद होत होते. त्यामुळे ती दोन मुले शुभम आणि बॉबी यांच्यासोबत वेगळी राहत होती. अतुल आणि त्याचा भाऊ राजू हे दोघेही मामी पिंकीला मदत करीत होते. त्यामुळे दोघांचेही पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मामाला होता. राजूचे मामीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी भाचा राजू हा पत्नीच्या घरून जाताना दिसला. मामाने त्याला अडवून विचारणा केली असता तो कोणतेही उत्तर न देता निघून गेला. त्यामुळे पत्नीचे नक्कीच राजूसोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशय पक्का मनात बसला.

Murder
चाहत्‍यांचे प्रेम हेच माझ्या तारुण्‍याचे रहस्‍य ; सचिन पिळगावकर

पत्नीला विचारला जाब

शुक्रवारी रात्री दिनेशने दारू ढोसली. दहा वाजताच्या सुमारास तो पत्नी पिंकीच्या घरी गेला. त्यावेळी पिंकी एकटीच घरी होती. त्याने राजूशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबत जाब विचारला. त्याने पत्नीशी वाद घालून अश्‍लील शिवीगाळ केली आणि धमकी देऊन निघून गेला. काही मिनीटातच मुलगा शुभम घरी पोहचला. आईच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याची माहिती मिळताच त्याने अतुलला फोन केला. ते दोघेही समजूत घालण्यासाठी दिनेशच्या घरी गेले, परंतु तो घरी आढळून आला नाही.

पाईपने फोडले डोके

मुलगा शुभम आणि भाचा अतुल हे दोघे जण मारण्यासाठी घरी येऊन गेल्याचा समज दिनेशला झाला. त्यामुळे दिनेशने लोखंडी पाईप हातात घेऊन दोघांचा शोध सुरू केला. रात्री साडेबारा वाजता अतुल घरी जाताना मामा दिनेशला दिसला. त्याने मागून जाऊन अतुलच्या डोक्यावर सपासप वार केले आणि पळून गेला. अतुलला नागरिकांनी रूग्णालयात नेले. परंतु तो उपचारापूर्वीच मृत पावला. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिनेश लोखंडेला अटक केला. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com