.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : एकीकडे राज्यात बेरोजगारीचा कहर आहे, तर दुसरीकडे रोजगाराच्या आशेने तरुणांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सीताबर्डी पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात माजी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावाने पैसे उकळल्याचे प्रकरण पुढे आले आहे. कॉग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.