
Nagpur
sakal
नांदा गोमुख : नांदा गोमुख परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्रथमच इतक्या तीव्रतेने पाऊस झाल्याने अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. कपाशीचे पीक पूर्णतः वाहून गेले असून संत्रा पिकाचा आंब्या बार गळून गेला असून मोसंबीचे पीक सुद्धा उद्ध्वस्त झाले आहे.