Anil Deshmukh: अमेरिकेच्या टॅरिफचा कापूस उत्पादकांना फटका : अनिल देशमुख
cotton farmers: अमेरिकेने भारतीय कापड निर्यातीवर ५०% टॅरिफ लावल्याने महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांवर मोठा फटका बसणार आहे. कापसाचे भाव हमीभावापेक्षाही खाली गेल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नागपूर : राज्यात जवळपास ४० लाख ७३ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होऊनही कापसाची विदेशातून आयात करण्यात येत आहे. यासाठी कापसावरील आयात शुल्क सुद्धा रद्द करण्यात आले आहे.