esakal | आता विद्यापीठ अन् महाविद्यालयातही मिळणार लस, प्राथमिक तयारी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

आता विद्यापीठ अन् महाविद्यालयातही मिळणार लस, प्राथमिक तयारी सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस मिळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर लसीकरण मोहीम (vaccination drive on university level) राबविण्याचा विचार करीत आहे. यासाठी मागील दोन आठवड्यांपासून प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTM nagpur university) राज्य सरकारला आकडेवारी पाठविली असून, त्यानुसार आतापर्यंत १३८ महाविद्यालयांमधील १८ वर्षांवरील सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांना लसीचा प्रथम डोस मिळाला आहे. (vaccination on university level starts soon in nagpur)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

कोरोनाची युवकांमध्ये लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसऱ्या लाटेत त्यामुळे बऱ्याच युवकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे राज्य सरकारने १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यातूनच राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयीनस्तरावर लसीकरण मोहीम राबवण्याच्या तयारी आहे. सध्या राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वी, नागपूर विद्यापीठाला राज्य सरकारकडून त्यांच्या सर्व विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये १८ वर्षांवरील किती विद्यार्थ्यांनी लसी दिली आहे याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व इतर सर्व माहिती लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश राज्य सरकारने विद्यापीठाला दिले. राज्य सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरू केली. परंतु, त्यास अनेक अडचणी आल्या. प्रथम लस कमी पडली. यानंतर लसीचा स्लॉट बुक करण्यात बरीच अडचण आली. अशा परिस्थितीत आता महाविद्यालय स्तरावर लसीकरण मोहीम सुरू केल्यास ती यशस्वीरीत्या पार पाडता येईल, असा विचार केला जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी त्या निर्णयाची वाट विद्यापीठाकडून बघण्यात येत आहे.

दररोज पाठविण्यात येते माहिती

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासंदर्भात दररोज विद्यापीठाला राज्य सरकारकडे अद्ययावत माहिती पाठवावी लागत आहे. या मोहिमेसाठी सरकारने प्रत्येक विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक नोडल अधिकारी म्हणून नेमले आहेत. नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मुदगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठांकडून महाविद्यालयांच्या वतीने विद्यार्थ्यांकडून सातत्याने डाटा मागण्यात येत आहे.