- अश्विनी देशकर नागपूर - प्यार कियो तो डरना क्या, अशी बंडाची भाषा वापरत सुरू झालेल्या प्रेमाचे अखेरचे साध्य हे कोणतेतरी नातेबंधन, रिलेशनशिप असते. पण, बदलत्या काळात ते तसे राहिले का? .आताची पिढी या रिलेशनशिपच्या बंधनात अडकण्यापेक्षा परिस्थितीनुसार जोडीदार बदलण्याच्या अशा सिच्युएशनशिपकडे ट्रान्सफर झाली आहे. प्रेमात असताना दोन व्यक्ती रिलेशनशिप मध्ये असल्याचे सांगतात. आमचे प्रेम अमर आहे असेही सांगतात. .प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जहाँ, तू मुमताज़ है मेरे ख़्वाबों की, मैं तेरा शाह-ए-जहाँ… असे सांगत एकमेकांची गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून ओळख करून देत लग्नाची स्वप्ने बघतात. पण हे स्वप्न हळूहळू विरत जाते आणि ते कधी ये नही तो वो, अशा स्थितीत पोहचते, हे कळत नाही..आता तर 'लिव्ह इन'चा जमाना सुरू झाला आहे. ज्यात दोन व्यक्ती कुठल्याही जबाबदारी आणि अटीशिवाय एकत्र राहतात. या नात्यात कोणतीही आश्वासने नाहीत, भविष्याबद्दल चर्चा नाही. शिवाय भावनिक बंधही नाही. .अशा स्थितीमध्ये ते दोघेही एकमेकांच्या वैयक्तिक सुखदुःखापासून अलिप्तच असतात. या सिच्युएशनकेंद्रित लिव्ह इनमध्ये सच्च्या प्रेमातील निरागसता, भावनिक ओलावा कसा येणार? आज तरुणांमध्ये प्रेमाच्या रिलेशनशिपपेक्षा सिचुएशनशिपचे प्रेम मोठ्या प्रमाणात ट्रेंड करताना दिसतेय. त्यामुळे तरुणांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आपण तो खराच रिलेशनशिपचा साजरा करतोय की सिचुएशनशिपचा, हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. .ओलावा संपलाअगोदर प्रेम व्यक्त करताना शब्दांची गरज नव्हती. नजरांच्या माध्यमातूनही एकमेकांविषयीच्या प्रेमाची भाषा समजली जात होती. पण आता ती भाषा जवळिकतेच्या डेटिंगमध्ये बदलली आहे. 'फुल तुम्हे भेजा है खत में....' पासून सुरू झालेला हा प्रवास 'कबुत्तर जा जा....' पर्यंत पोहचला. पत्रांची आणि ग्रिटींग्सची जागा आता फेसबुक, इंन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिंडर सारख्या समाज माध्यमांनी व डेटिंग अॅपने घेतलेली आहे. मात्र आज प्रेम व्यक्त करण्याचे ते साधन सुद्धा बदलले आहे. खरे म्हणावे तर प्रेम हे 'हायटेक' झाले आहे. प्रेमातला भावनिक ओलावा आताच्या नव्या तंत्रज्ञानाने संपवून टाकला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.