Valentines Day : व्हॅलेंटाइन डेला प्रपोज नव्हे, थेट लगीनगाठीचा थाट; प्रेमवीरांनी साधला मुहूर्त
Nagpur Weddings : व्हॅलेंटाइन डे हा प्रेमवीरांचा दिवस असला तरी काही नागपूरमधील प्रेमवीरांनी हा दिवस थेट लग्नासाठी निवडला. विवाह नोंदणी कार्यालयात या दिवशी ३५ ते ४० लग्नांची नोंद होणार आहे.
नागपूर : ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हटले की प्रेमविरांचा दिवस. हा दिवस आपल्या प्रेयसी किंवा प्रीयकरासोबत हटके साजरा करण्याकडे प्रेमवीरांचा कल असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनेकजण हा दिवस निवडतात.