
Nagpur Fire Accident
sakal
नागपूर : वांजरा परिसरात गॅस गोदामाजवळ लागलेल्या भीषण आगीत दोन इमारतींमधील पाच कारखाने व गोदाम भस्मसात झाले. रविवारी (ता.१२) सकाळी ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून सुमारे ५५ लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन जवानांनी सहा बंबांच्या मदतीने सलग तीन तास पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली.