
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सतत हुलकावणी देत असलेल्या वरुणराजाने अखेर बुधवारी नागपूरकरांची इच्छा पूर्ण केली. सायंकाळी तास-दीड तास कधी जोरदार, तर कधी संततधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचेच चेहरे खुलले. उशिरा का होईना आता विदर्भात मॉन्सून सक्रिय झाल्याने आगामी दिवसांतही दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे.