Cycling Journey : सायकलवर ७०० किमीचा प्रवास पूर्ण करणारी प्रीती निमजे यांची प्रेरणादायक गाथा
Nagpur News : वेकोलिच्या वरिष्ठ व्यवस्थापक प्रीती निमजे यांनी नागपूरहून पंढरपूरपर्यंत ७०० किलोमीटर सायकल यात्रा सहा दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण केली. या कामगिरीवर वेकोलिचे संचालक बिक्रम घोष यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नागपूर : जिद्द, दृढ संकल्प व कठोर परिश्रमाचे आदर्श उदाहरण सादर करताना वेकोलिच्या वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त) प्रीती निमजे यांनी सायकलवरून ७०० किलोमीटरचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.