Nagpur News : कुलगुरू डॉ. बोकारे यांच्याकडून काढला नागपूर विद्यापीठाचा प्रभार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडून राज्यपालांनी काढून घेतला.
vice chancellor dr. prashant bokare
vice chancellor dr. prashant bokaresakal
Updated on: 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडून राज्यपालांनी काढून घेतला आहे. आता नागपूर विभागाच्या अपर आयुक्तांकडे या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. डॉ. बोकारे हे गेल्या सहा महिन्यांपासून या पदाचा कार्यभार होता.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आल्यावर डॉ. बोकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाची सुत्रे देण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी डॉ. चौधरी यांचे आजारपणाने मृत्यू झाला. तेव्हापासून डॉ. बोकारे हे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.

मात्र, नियमानुसार एका विद्यापीठाचा कार्यभार सहा महिन्यापेक्षा जास्त साभांळता येत नसल्याने त्यांना राज्यपाल कार्यालयातून बुधवारी तडकाफडकी आदेश काढून पद सोडण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दरम्यान आता या पदाची सुत्रे विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. सोमवारी (ता.१७) त्या पदाची सुत्रे स्वीकारतील.

विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अद्याप सुरू व्हायची आहे. विद्यापीठाकडून समितीसाठी एका सदस्याची निवड करण्यात आली आहे. मात्र, अध्यक्ष आणि सचिवांची राज्यपाल कार्यालयाकडून निवड व्हायची असल्याने पद भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची जाहिरात काढण्यात आलेली नाही. त्यातूनच कुलगुरू पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. याशिवाय नव्या कुलगुरूंसाठी अजून किमान दोन महिने वाट बघावी लागणार आहे.

अनेक वर्षांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्याकडे सुत्रे

विद्यापीठात कुलगुरूंचे पद रिक्त झाल्यावर नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीपर्यंत यापूर्वी अनेक वर्ष विभागीय आयुक्तांच्या हाती देण्यात येत होता. दरम्यान विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यानंतर कुलगुरू पदाची जबाबदारी नजिकच्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाकडे देण्यात आली. मात्र, त्यानंतर प्रथमच एखाद्या विभागातील अपर आयुक्ताकडे पदभार देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Nagpur traffic police extortion case latest news
Nagpur Graduate Constituency Election
Mafsu Vice Chancellor, Manali Kshirsagar,
Maharashtra Drought Review Meeting Cancelled Agriculture Minister Meetings In Pune And Nagpur Divisions Postponed
Marathi News Esakal
www.esakal.com