
नागपूर : विदर्भातील उद्योग-व्यवसायाला चालना देणारी प्रशासकीय यंत्रणाच सक्षम नसल्याचा आरोप फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष परेश राजा यांनी केला. विदर्भातील औद्योगिक विकास खुंटण्याचे मुख्य कारण येथील पॉवरलेस अधिकारी असल्याची परखड टीका त्यांनी केली. परेश राजा यांनी म्हणाले, राज्य सरकारने त्वरित नवीन औद्योगिक धोरण जाहीर करावे.