

Nagpur News
esakal
नागपूर: यंदाचा नवतपा किती तापदायक राहणार याचा ट्रेलर रविवारी वैदर्भीयांना अनुभवायला मिळाला. नागपूर व ब्रह्मपुरीसह विदर्भातील जवळपास सर्वच शहरांच्या कमाल तापमानाने जोरदार उसळी घेत उष्णलाट आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत दिले. ब्रह्मपुरी येथे राज्यासह देशात सर्वाधिक ४७.२ अंशांची नोंद करण्यात आली तर उपराजधानीचा पारा ४५.४ अंशांवर पोहोचला.