nagarpalika election postpond
sakal
नागपूर - प्रचारतोफा अंतिम टप्प्यात असतानाच विदर्भातील काही पाच नगरपालिकांच्या निवडणुका तर काही पालिकांमधील प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी, यवतमाळ, चंद्रपुरातील घुग्गुस, अकोल्यातील बाळापूर, वर्धेतील देवळी येथील नगराध्यक्षांसह, सदस्यपदाच्या निवडणुका आता सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. याशिवाय यवतमाळ, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, वर्धा, गोंदिया येथील काही प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.