Nagpur Weather : तब्बल दीड महिन्यानंतर नागपूर तापले; पारा ४३ अंशांवर, ब्रह्मपुरीत उच्चांकी तापमानाची नोंद
Weather Update : नवतपानंतरही विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, नागपुरात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी राज्यातील सर्वाधिक तापलेल्या ठिकाणांपैकी एक ठरले असून, पुढील काही दिवस संमिश्र वातावरण राहणार आहे.
नागपूर : सर्वाधिक उन्हाच्या मे महिन्यापाठोपाठ नवतपाही ‘कुल’ गेल्यानंतर विदर्भात अचानक उन्हाचा तडाखा वाढला आहे. कमाल तापमानाने रविवारी पुन्हा जोरदार उसळी घेत एक महिन्यातील नवा उच्चांक नोंदविला.