

Uddhav Thackeray Rejects Vidarbha Statehood Demand
sakal
नागपूर : हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा मुद्दा पेटला असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीला ठाम विरोध दर्शवला. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. म्हणूनच वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र अखंड राहणार की तुकडे करणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी केली.