

Vidarbha Urban Polls: Clash of Titans Between BJP and Congress Leaders
Sakal
नागपूर: विदर्भातील अकराही जिल्ह्यांमधील १०० नगर परिषदा व पंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुकीतून विदर्भातील शहरी क्षेत्रांवर कोणाचा राजकीय प्रभाव आहे, याचा निर्णय लागणार आहे. गेल्या दीड वर्षात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुती व महाआघाडी यांच्यासाठी वेगवेगळे जनादेश आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.