महिलांसंदर्भात असभ्य वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; शिवसैनिकांचा ठाण्यासमोर ठाण

Video of vulgar remarks about women goes viral on social media
Video of vulgar remarks about women goes viral on social media
Updated on

नागपूर : महिलांसंदर्भात असभ्य वक्तव्य करणाऱ्या अरबाज खान नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. या प्रकाराने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. सदर ठाण्यासमोर ठाण मांडून आरोपीच्या अटकेची मागणी केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच शिवसैनिक शांत झाले.

अरबाज खान नावाच्या व्यक्तीची विशिष्ट संप्रदायातील महिलांबाबत आपत्तीजनक विधानाची क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल होत होती. याबाबत कळताच महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्यासह शिवसैनिकांनी सदर ठाण्याला घेराव घालून घोषणा सुरू करण्यात आल्या. ठाणेदारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अटक करण्यात आल्याचीही माहिती दिली. मात्र, आंदोलकांचा राग शांत होत नव्हता.

पोलिस आयुक्तांशी चर्चेशिवाय परत जाणार नाही. आरोपीला न्यायालयात घेऊन जाईपर्यंत घेराव कायम राहील, असा इशाराच पोलिसांना देण्यात आला. सायंकाळी पोलिस आयुक्त ठाण्यात पोहोचले. त्यांनीही आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणातील सर्वच आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी रेटली.

अमितेश कुमार यांनी आंदोलकांना शांत करीत या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली. त्यानंतर शिवसैनिक शांत होऊन परतले. आंदोलनात हितेश यादव, मुन्ना तिवारी, मनोज सिंह, परमात्मा पांडे, हरी बनाईत, विवेक मिश्रा, बंडू ताळवेकर, गुड्डू रहांगडाले, आशीष हाडगे, मनोज शाहू, अक्षय मेश्राम, आकाश पांडे, शशिकांत ठाकरे, पवन घुग्गुसकर, धीरज फैंदी, किरण शेडके, सचिन दकोर, राम कुकाडे, मंगेश ठाकरे, बंटी धुर्वे, गौरव शाहू, अभिषेक धुर्वे आदी सहभागी झाले होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com