
नागपूर : विधानभवन विस्तारीकरणाच्या जागेवरून शासकीय मुद्रणालय आणि पुरवठा विभाग यांच्यामध्ये असलेला वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे. उद्योग विभागाने विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजासाठी ग्रंथालयाची ९ हजार ६७० चौ.मी. जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित केली आहे. त्या बदल्यात मुद्रणालयाला त्यांच्याकडे उपलब्ध जागेवरच शासनाकडून पुनर्विकास करून देण्याचे विचाराधीन असल्याचे समजते.