Vidhan Parishad Election : चंद्रशेखर बावनकुळेंचा आज उमेदवारी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Parishad Election : चंद्रशेखर बावनकुळेंचा आज उमेदवारी अर्ज
Vidhan Parishad Election : चंद्रशेखर बावनकुळेंचा आज उमेदवारी अर्ज

Vidhan Parishad Election : चंद्रशेखर बावनकुळेंचा आज उमेदवारी अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. उद्या, सोमवारी सकाळी १०.३० वाजता भाजप नेते,कार्यकर्ते आकाशवाणी चौकात एकत्र येणार आहेत. येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात जातील.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

यावेळी निवडणूक प्रमुख शहर भाजप अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री टेकचंद सावरकर, समीर मेघे, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, नागो गाणार, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनिषा धावडे, माजी खासदार अजय संचेती, सत्ता पक्षनेता अविनाश ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, माजी आमदार सुधाकर देशमुख,अनिल सोले,सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे तसेच चरणसिंग ठाकुर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हापरिषद, नगरपालिका, पंचायत समितिचे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

loading image
go to top