Vijay Wadettiwar
sakal
नागपूर - नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यातच संपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १४ डिसेंबर असा सात दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला. अधिवेशन इतक्या लहान कालावधी असणे म्हणजे लोकांच्या प्रश्नांना सरकारला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याचे दर्शवते, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.