
Vijay Wadettiwar
esakal
महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजातली नाराजी आता उफाळून आली आहे. विदर्भातील ओबीसी समाजाच्या महामेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला कडाडून सावध केलं. "सरकार जरांगेसमोर झुकलंय! आता २ सप्टेंबरचा जीआर रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही," असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.