esakal | चोवीस तास पाणी कुठल्या वस्तीत मिळते? भाजपला मागितला हिशेब
sakal

बोलून बातमी शोधा

चोवीस तास पाणी कुठल्या वस्तीत मिळते? भाजपला मागितला हिशेब

चोवीस तास पाणी कुठल्या वस्तीत मिळते? भाजपला मागितला हिशेब

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : भारतीय जनता पक्षामुळेच नागपूर शहराचा विकास झाला या भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. विकास झाला म्हणणाऱ्या भाजपने पंधरा वर्षांचा हिशेब देण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

पंधरा वर्षांपासून शहरात भाजप सत्तेवर आहेत. या काळात विकासकामांच्या अनेक घोषणा केल्या पण त्यातील किती पूर्ण झाल्या हे भाजपने सांगावे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्यांनी पोपटपंची बंद करावी, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. चोवीस बाय सात योजना २०१८ पर्यंत पूर्णत्वास येणार होती पण ती का झाली नाही? लंडन स्ट्रीट १५ वर्षांपासून मनपाच्या अर्थसंकल्पाच्या कागदावरच का आहे? असेही ठाकरे म्हणाले. त्यांनी एकूण २२ प्रश्न उपस्थित करीत त्यांचे उत्तर देण्याचे आव्हान कॉंग्रेस शहराध्यक्षांनी दिले.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

खालील प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यावीत

  • शहराच्या कोणत्या भागात चोवीस तास पाणी मिळते?

  • लंडन स्‍ट्रीटचे काय झाले?

  • पटर्वर्धन मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचे काय झाले?

  • ११५० कोटींचा सिवरेज प्रकल्प कधी होणार?

  • नागनदीतून बोटी कधी धावणार?

  • स्कॅनियाने इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस परत का नेल्या?

  • अंबाझरी उद्यान मे.गरुडा कंपनीच्या घशात कोणी घातले?

  • स्मार्ट सिटी प्रकल्पातील ‘होम-स्वीट-होम’ होणार आहे की नाही?

  • गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, नाईक तलावांचे सौदर्यीकरणाचे काय झाले?

  • विधानसभानिहाय हॉस्पिटल उभारण्याच्या घोषणेचे काय?

loading image
go to top