महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, आरोपींमध्ये स्वकीयच अधिक

Crime_Women
Crime_Womene sakal

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून उपराजधानीत महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये अचानक (violence against women) वाढ झाली आहे. विवाहबाह्य संबंध आणि प्रेमप्रकरणांमुळे बलात्कारांच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून अधोरेखित झाले. जुलै महिन्यांच्या अखेरपर्यंत शहरात तब्बल १०८ बलात्कारांचे गुन्हे दाखल असून अद्याप वर्ष सुरू आहे. मागील वर्षभरात १७२ बलात्कारांचे गुन्हे दाखल आहेत. (violence against women increase in nagpur)

Crime_Women
दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग आणि महिलांवरील हिंसाचाराविरुद्ध गुन्ह्यांचा आलेख चढतच जात आहेत. अनैतिक संबंध, प्रेमसंबंध आणि विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच पतीशी पटत नसल्याने परपुरूषासोबत मैत्री करीत महिलांचे संबंध ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. तर अनेक पुरुष पैसा आणि अन्य प्रकारे महिलांवर भूरळ घालून अनैतिक संबंधांकडे वळत आहे. एकमेकांशी तडजोड करून मर्जी राखण्यासाठी अनेकांची धावपळ असते. जर संबंधात कटुता किंवा अनियमितता निर्माण झाल्यास युवती, महिला थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतात. त्यातूनच लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बलात्काराच्या आरोपींमध्ये प्रियकर, जवळचे नातेवाईक आणि आप्तांचाही आरोपींमध्ये समावेश असल्याचेही समोर आले आहे.

लैंगिक शोषणात आप्त-स्वकियच जास्त :

आतापर्यंतच्या बलात्काराच्या घटनांमध्ये अनोळखी व्यक्तीने बलात्कार केल्याच्या घटना जवळपास १० टक्केच आहेत. परंतु, ९० टक्के बलात्कारांच्या गुन्ह्यांत ओळखीचे व्यक्ती, मित्र, नातेवाईक आणि चक्क आप्त-स्वकियांचाच समावेश असतो. काही घटनांमध्ये सख्खा बाप, मामा, भाऊ आणि काकांनीही बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पवित्र नात्याला काळिमा फासल्या जात आहे.

गुन्हेगारांवर वचक हवाच!

आयुक्तालयातील मागील दोन वर्षांची महिला अत्याचारासंबंधी गुन्ह्यांची आकडेवारीही गंभीर आहे. बलात्कार, विनयभंगासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यातही १८ वर्षांखालील मुलीवरील बलात्काराच्या घटना सर्वाधिक आहेत. घटना रोखण्यासाठी ठोस कृती होत नसून न्यायालयातही खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. त्यामुळे एखाद्या पीडितेला न्यायही लवकर मिळत नाही. त्यामुळे आजही विनयभंग, बलात्काराच्या घटना होत आहेत.

‘ब्रेक अप’ झाले...पोलिसात तक्रार

युवक आणि युवती एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोन ते तीन वर्षे प्रेमसंबंध सुरळीत सुरू असतात. दोघांच्या भेटी, लॉज आणि पर्यटनस्थळी भ्रमंती आणि व्हेलेंटाईन विकमधील एंजॉय सर्व काही व्यवस्थित असते. मात्र, तिच्या किंवा त्याच्या जीवनात कुणीतरी डोकावले की प्रेमीयुगुलांमध्ये बिनसते. एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेतला की ‘ब्रेक अप’ होते. त्यानंतर थेट अनेक युवती थेट पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करते, ही बाब नवी नाही.

अल्पवयीनांचे प्रेम की आकर्षण -

शाळकरी किंवा नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश केलेल्या मुला-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण असते. त्यालाच ते प्रेम समजतात. नको त्या वयात शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. असे प्रेमप्रकरणे समज नसल्यामुळे जास्त दिवस टिकत नाही. पालकांपर्यंत प्रकरण पोहचले की त्याचा बाऊ केला जातो. काही जण बदनामीच्या भीतीने गप्प बसतात तर अनेक जण थेट पोलिसांत तक्रारी करतात.

सोशल मीडियावर बदनामी -

प्रेमी युगुल अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत फोटो काढतात. तर अनेक प्रेमी युगुल शारीरिक संबंध किंवा नाजूक क्षणांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करतात. अनेकदा प्रियकर प्रेयसीला नको त्या अवस्थेत सेल्फी पाठविण्यासाठी बाध्य करतात. दोघांतील संबंधात वितुष्ट आले की युवक सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करतो किंवा थेट व्हायरल करतो. अशा प्रकारातूनही बलात्कारचे गुन्हे दाखल होत आहेत.

वर्ष - बलात्कार

  • २०२० - १७२

  • २०२१ (जूनपर्यंत) -१०८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com